Posts

Showing posts from May, 2017

अंतरातली अंतरे...

Image
__प्रवास__ तू आणि मी... घडीचे प्रवासी... अनोळखी होतो एकमेकांना सुरुवातीला... भेटलो असेच आपण एकदा मैत्रीच्या थांब्यावर... आणि एक सुखेनैव प्रवास सुरु झाला... तुझा आणि माझा... वाटेत काही प्रवासीही भेटले... चांगले , वाईट , हव्यासी , स्वार्थी... सर्वांशी जुळवून घेत आपला आनंदी प्रवास सुरूच होता... विश्वासाचा , आपुलकीचा , काळजीचा... पण... प्रेमाच्या थांब्याअगोदरच निघून गेलीस तू , न सांगता... मला या प्रवाशांसोबत एकटं सोडून... माझा प्रवास सुरूच आहे... तुझ्या शोधात... तू मिळेपर्यंत... __________________________________________ __स्वप्न__ स्वप्नं पडायची मला तशी अधून मधून... पण तू आलीस , आणि त्या स्वप्नांना अर्थ मिळाला... तुझ्या सहवासाने त्या स्वप्नांत नवीन रंग भरले गेले... स्वप्नांच्या नवनवीन लहरी जाणवू लागल्या मला... तुझ्या एक एक प्रतिक्रियेमागं... एक दिवस धाडस करून विचारायचं ठरवलं तुझ्या स्वप्नांना , माझ्या स्वप्नात सामावण्यासाठी... मात्र , तू तुझ्या स्वप्नाविषयी सांगितलंस मला... त्यानंतर मला स्वप्नच नाही पडलं... __________________________

एकमेक

Image
तिला माहित होतं का , कि तो तिच्याशी बोलल्याशिवाय झोपत नव्हता... तिला माहित होतं का , कि तो नेहमी पांढरा रुमाल सोबत ठेवायचा , तिचा आवडता रंग म्हणून... तिला माहित होतं का , कि तो नेहमी मोबाईल डाव्या खिशात ठेवायचा... तिला माहित होतं का , कि तिला "त्याचा" सर्वात जास्त आवडलेला फोटो , त्याच्या फोन मध्ये तिचा "contact wallpaper" होता... तिला माहित होतं का , कि त्याचा wallpaper बदलायचा , जेव्हा तिचा DP बदलायचा... तिला माहित होतं का , कि तो त्याची आवड जिंकवी म्हणून , MATCH संपेपर्यंत FINGER CROSSED ठेवायचा , कितीही दुखलं तरी... तिला माहित होतं का , कि तो तिच्या पहिल्या भेटीनंतर नेहमी डाव्या पायात पहिल्यांदा मोजे चढवायचा... तिला माहित होतं का , कि त्याला वातावरण बदलांनी नाही तर , TENSIONS मुळे ताप यायचा... तिला माहित होतं का , कि निरुद्देश भटकणं , अगदी दूर दूर पर्यंत , हा त्याचा आवडता छंद होता... तिला माहित होतं का , कि तो महत्त्वाच्या कामाच्या अगोदर अर्धा तास कुणाशी , अगदी कुणाशीच बोलत नव्हता , त्याच्या श्रद्धेपायी... तिला माहित होतं का , कि तो "ते

धक्का...?

        अवि आणि श्री . दोघंही नाट्यप्रेमी . श्री ला लेखनाची आवड ; तर अविला , श्री जे लिहील , त्याला दृश्य रूप द्यायची ! कॉलेज पासून एकत्र . अनेक एकांकिका स्पर्धा गाजवलेल्या , या जोडगोळीने . नाटकावर निरंतन प्रेम दोघांचं . कॉलेज नंतर दोघंही नोकरीला लागलेले , कुटुंबाकरिता . पण , नाटकावरचं त्यांचं प्रेम तसूभरही कमी नव्हतं झालं . दोघे हौशी नाट्यप्रयोग करत राहायचे . श्री त्यातल्या त्यात सर्जनशील . सतत नवनवीन प्रयोग करत राहायची त्याला फार खुमखुमी .         असाच एकदा अविला श्री चा कॉल आला . " अरे , वेळ आहे का ? येतोस का घरी जरा ? नवीन विषय घोळतोय डोक्यात . ..... . नाही , नाही ! विनोदी किंवा social सोडून काहीतरी करूया म्हणतोय . ..... . हो , हो . नक्की . आधी basic plot ऎकवतो . मग तुझे ते ' Directorial पॉईंट्स ' सांग . जरा जास्त वेळ जाईल , असं वाटतंय . So , जेवायलाच ये रात्री ; आणि बायको पण नाहीये , मनसोक्त गप्पा मारता येतील. .... . ठीके , मग . ये . वाट बघतोय . " .... " अरे , काही नाही . असाच सकाळी मनात विचार आला . तसंही , बऱ्याच दिवासात काही creative काम नाही क

तो आणि ती

Image
तो आणि ती... ती एकदम बडबडी , मुक्त , स्वच्छंद,talkative... तो मात्र जरा अबोल , स्वैर , आत्ममग्न... तिच्या पटापट ओळखी व्हायच्या , बोलघेवडी होती नं... त्याचा स्वभाव मात्र जरा कठोर , मोजून मापून , अंदाजानं बोलणारा . यामुळं मोजकंच मित्रमंडळ त्याचं... ती सर्वांशी मिळून मिसळून राहणार , सगळ्यांशी गोड बोलणार , हसत खेळत वागणार... तो मात्र जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबतच मजा करणार , बाकीच्यांशी बोलताना मात्र १ घाव २ तुकडे... तिचे १७६० मित्र... त्याची १८५६ भांडणं... तिला बोलायची आवड... तासनतास एकटं बसून राहायची त्याची पहिली निवड... ती सर्वांशी openly बोलायची , अगदी मुलांशीपण... तो जरा हातचं राखून बोलणारा , सगळ्याच मुलींशी नाही पटायचं त्याचं , त्याच्या मित्रमंडळात असतील तितक्याच... तिचा स्वभाव मृदू , मनमिळावू , खेळकर , संवेदनशील... तो मात्र जरा कठोर , उग्र , तापट... १ उत्तर ध्रुव , तर २ दक्षिण ध्रुव  #Extremities... पण यांना सांधणारा एक दुवा होता... हो... तो दुवा म्हणजे एक स्पर्धा होती , एक Inter-Collegiate विविध गुणदर्शन स्पर्धा... त्यांच्या

अडथळ्याची शर्यत

लग्न... असं म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या असतात. म्हणजे कुठले २ जीव आयुष्यभर एकमेकांची साथ निभावणार हे अगोदरच ठरलेलं असतं. असो... आता , लग्न म्हणजे २ जीवांचे आयुष्यभरासाठी मिलन ( फक्त त्यांच्यासाठीच . बाकीच्यांकरिता १ दिवसाचा आनंदसोहळा(!) ). आपल्या संस्कृतीनुसार अगदी "साता-जन्मासाठीचं" ! पण , काळाच्या ओघात 'काळ'च बदलला आणि या मिलनासाठी सुद्धा एक ना अनेक अडथळे उभारले गेले आणि लग्न म्हणजे जणू अडथळ्यांची एक शर्यतच झाली ! एखाद्याला लग्न करायचं असेल , तर हे अडथळे पार केल्याशिवाय तो सुखानं वैवाहिक जीवन जगूच शकत नाही. कारण , लग्न ठरवताना , त्या २ जीवांना काय वाटतं यापेक्षा ; समाज काय म्हणेल , शेजारी काय म्हणतील , सामाजिक प्रतिमा डागाळेल का , जोडा कसा दिसतो ,  हे मुद्दे महत्त्वाचे ना !!! मग जरी ती दोघं एकमेकांना पसंत असेनात का , ती एकमेकांसोबत compatible असेनात का , वरील महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतल्याशिवाय आणि हे ९ कोटी ५७ लाख अडथळे पार केल्याशिवाय त्यांचं वैवाहिक जीवन सुखी होऊच शकत नाही . कारण , ते एकमेकांसाठी किंवा एकमेकांच्या कुटुंबासाठी नाही , तर सम