Posts

Showing posts from September, 2017

ती...

Image
          " चल . आम्ही निघतो . आजीला २ आठवडे बेड-रेस्ट सांगितली आहे . तिला जरा बरं वाटेपर्यंत मला आणि बाबांना तिथंच राहावं लागेल . तिकडचा जास्त विचार नको करू . तुझं हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे . अभ्यासावर लक्ष दे . इतकं जास्त नाहीये आजारपण ."           "........"           " अरे हो . तुला सांगितलं ना , तिकडं नको लक्ष देऊ . आहे आता ती बरी . तू अभ्यास व्यवस्थित कर . आणि हो , दूधाचं सांगितलंय मी . फक्त सकाळी त्याला आठवण करून दे . काकूंना सांगितलंय . त्या देतील रोज सकाळचा डबा . रात्रीचं त्यांना नाही जमणार . बघ तू . हां ? निघतो . "           ऐकत बसलेलो मी . सगळ्या सूचना . मुलगा कितीही मोठा होऊ दे , आई वडिलांसाठी तो नेहमीच ' बाळ ' असतो , या तत्त्वानुसार त्या सूचना चालू होत्या . शेवटी निघाले ते . गावी . २ आठवडे तरी आता मला माझ्या मनाप्रमाणे वागायची मुभा होती . त्यांच्या सूचना चालू असताना , मी मनातल्या मनात , या २ आठवड्यांची " TO-DO " लिस्ट तयार करत होतो . अभ्यास तर होताच . या काळात बघायचे पिक्चर , नाटकं , football चे रात्री चालणारे सामने ,