धक्का...?

        अवि आणि श्री . दोघंही नाट्यप्रेमी . श्री ला लेखनाची आवड ; तर अविला , श्री जे लिहील , त्याला दृश्य रूप द्यायची ! कॉलेज पासून एकत्र . अनेक एकांकिका स्पर्धा गाजवलेल्या , या जोडगोळीने . नाटकावर निरंतन प्रेम दोघांचं . कॉलेज नंतर दोघंही नोकरीला लागलेले , कुटुंबाकरिता . पण , नाटकावरचं त्यांचं प्रेम तसूभरही कमी नव्हतं झालं . दोघे हौशी नाट्यप्रयोग करत राहायचे . श्री त्यातल्या त्यात सर्जनशील . सतत नवनवीन प्रयोग करत राहायची त्याला फार खुमखुमी .

        असाच एकदा अविला श्री चा कॉल आला . " अरे , वेळ आहे का ? येतोस का घरी जरा ? नवीन विषय घोळतोय डोक्यात . ..... . नाही , नाही ! विनोदी किंवा social सोडून काहीतरी करूया म्हणतोय . ..... . हो , हो . नक्की . आधी basic plot ऎकवतो . मग तुझे ते ' Directorial पॉईंट्स ' सांग . जरा जास्त वेळ जाईल , असं वाटतंय . So , जेवायलाच ये रात्री ; आणि बायको पण नाहीये , मनसोक्त गप्पा मारता येतील. .... . ठीके , मग . ये . वाट बघतोय . "

....
" अरे , काही नाही . असाच सकाळी मनात विचार आला . तसंही , बऱ्याच दिवासात काही creative काम नाही केलेलं . जर ड्राफ्ट आवडला तुला , तर ग्रुपला विचारू , आणि लगेच कामाला लागू . कसं ? "

" ऎक तर . हे बघ , आपल्या कथेची नायिका एक नुकतीच लग्न झालेली , पंचविशी-तिशीतली मुलगी असेल . ती संसारात सुखी आहे , तो ही. नवऱ्याला चांगला पगार . ती ही कमावती . सगळं मजेत चाललंय . एकमेकांविषयी कोणतीही तक्रार नाही . दोघंही एकमेकांना वेळ देतात . अगदी सुखासीन आयुष्य . IDEAL ! "

" होता होता तिचं promotion येतं . Qualification exam चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेली असते ती . पण , promotion साठी तिच्या कंपनीने एक ट्रेनिंग compulsory ठेवलेलं असतं . ते असतं दिल्लीला . १ वर्षासाठी . त्याला ती सर्व सांगते . तो सहमत असतो तिच्याशी . "

" दिल्लीगमनाची सर्व तयारी होते . सर्व सामानाची आवराआवर करून ती निघते , स्वप्न पूर्ण करायला स्वतःचं . कारण , हे training म्हणजे तिचे , कंपनीच्या Assistant Manager पदाकडे जाणारे , सुरुवातीचे पण महत्त्वाचे पाऊल असते . "

" पूर्णपणे नवीन शहर असतं ते तिच्यासाठी . सवय व्हायला १-२ आठवडे जातात . हळूहळू रुळायला लागते . खूप व्यस्त वेळापत्रक असतं तिचं . Training सुद्धा थोडं किचकटच असतं . तिची राहण्याची व्यवस्था कंपनीकडूनच केलेली असते , स्टाफ quarters मध्ये . प्रत्येक खोलीत दोघे . तिचा रूममेट , मध्य प्रदेशचा , त्याच कारणासाठी तिथे आलेला असतो , तिच्यासारखीच स्वप्ने उराशी बाळगून . सुरुवातीला ओळख नसल्याने , एकमेकांशी केवळ औपचारिक बोलण्यातच , ते धन्यता मानत असतात . तो तिच्या अगोदर २ महिने training ला आलेला असतो . "

" असं म्हणतात की , घरापासून जर एखादा बऱ्याच काळासाठी दूर गेला असेल , तर त्याचं मन एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला शोधत राहतं सतत . स्वतःचे प्रॉब्लेम्स , रोजच्या होणाऱ्या गमती , स्वतःची झालेली फजिती , किस्से सगळं सगळं share करायला . तर , इतक्या दूर आल्यामुळे एकतर तिचा नवऱ्याशी contact नव्हता होत . जो काही व्हायचा , तो आठवड्याच्या शेवटी ! तो ही जेमतेम वेळासाठीच . त्यामुळे , तिचं मनही अशी व्यक्ती शोधत होतं , नक्कीच . "

" हळूहळू , तिचा तिच्या रूममेट सोबतचा संवाद वाढू लागला . हळूहळू , ती एकेक गोष्ट त्याच्यासोबत share करू लागली . तो ही हळूहळू एक एक गोष्ट share करू लागला , तिच्यासोबत . होता होता त्यांच्यातली मैत्री वाढू लागली . Training सुद्धा त्याच्या त्याच्या गतीने व्यवस्थित चालू होतं . ४ महिने होत आले होते . त्यांचं नवीन नातं सुद्धा आकार घेत होतं . "

" त्यांना एकमेकांची सवयच झाली होती आता . त्यांना एकमेकांशी बोलल्याशिवाय करमतच नसे . अगदी कितीही व्यस्त दिवस गेला , तरी एकमेकांशी बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे . सुट्टीच्या दिवशी ते फिरायला जात , वेळ मजेत घालवत . होता होता , त्यांचं नातं मैत्रिच्या पुढे कधी गेलं ते त्यांनाही नाही समजलं . ६ महिने होत आले होते तिच्या training चे . "

" एक दिवस , त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या , एका क्षणिक सुखासाठी , अगदी दोघांच्याही नकळत ! घडून गेलं होतं जे घडायचं ते ! त्यानंतर २ महिन्यानी त्याचं training संपलं आणि तो त्याच्या त्याच्या गावी परतला . तिचे २ महिने बाकी होते अजून . पण , आता ती जरा खुश होती . कारण , घरापासून बाहेर आल्यानंतर आलेला तिचा एक प्रकारचा एकटेपणा त्याच्यामुळं नाहीसा झाला होता . तसंच , बाकी नवीन लोकांशीही ओळख झाली होती तिची . केवळ २ महिनेच उरलेले . मग ती ही घरी परतणार होती . "

" एक दिवस तिला अचानक बरं वाटेनासं झालं . डॉक्टरांनाही काही समजेना , नक्की काय होतंय तिला . तिला सगळ्या tests करायला लावल्या . Test चा रिपोर्ट आला . ती रिपोर्ट घेऊन रूमवर आली . रिपोर्ट वाचून तिला धक्काच बसला . त्यात स्पष्ट लिहलेलं ...
- AIDS POSITIVE ! "

" तिला अनामिक भीती वाटू लागली . घरी काय सांगू , कसं सांगू त्याला , काय वाटेल त्याला , तो काय विचार करेल , असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात थैमान घालू लागले . खरं तर जे घडून गेलं , त्यात चूक कुणाचीच नव्हती . ते दोघांच्याही अगदी नकळत घडून गेलं होतं . जे घडलं त्याचं चांगलं किंवा वाईट असं वर्गीकरण होऊ शकत नव्हतं . परिस्थितीही चुकीची नव्हती . पण , जे काही घडायचं ते घडून गेलं होतं . फक्त ४ आठवडे बाकी होते तिचं training संपायला . "

" कसेबसे ते ४ आठवडे ढकलले तिनं . Training संपलं . ती घरी यायला निघाली . तिनं त्याला जे काही घडलं , ते सगळं सांगायचं ठरवलेलं . अगदी , त्याची... "
इतक्यात श्री चा फोन वाजतो .

" हा बोल . .... . कधी ? उद्या ? किती वाजता ? .... . ठीक आहे , येतो मी . .... ."
" काय रे ? कोण ? "
" अरे अन्वी . ऑफिस च्या कामासाठी गेलेली , येतेय परत उद्या . "
" वहिनींना आणायला जायचंय तुला म्हणजे तुला , उद्या . "
" हो . सकाळी १० ला , airport वर. "
" ok ! कुठून येतायत वहिनी ? "
" दिल्लीहून "

............. समाप्त...?

©श्रेयस_जोशी

Comments

Popular posts from this blog

नातं

अडथळ्याची शर्यत

संवाद