Posts

Showing posts from April, 2017

काय करायचं ह्यांचं ?

बरेच दिवस बोलायचं होतं मंडळी , पण वेळ मिळत नव्हता ☺ तर , आपल्या आयुष्यात आपल्याला काही माणसं अशी भेटतात कि आपण त्यांना सुधरवूच शकत नाही. आपल्याला तरीही त्यांच्याबद्दल 'आपुलकी' वाटत असते. आता माणूस आहे म्हटल्यावर चुकणारच ! तसेच हे हि लोक काहीवेळा(?) चुकतात(??) ! म्हणून 'आपुलकी'पोटी आपण त्यांना समजवायला जातो. त्यांना त्यांची चूक निदर्शनास आणून देण्याचा वायफळ(!) प्रयत्न करतो. आपल्याला माहित असतं कि हा सुधारणाऱ्यातला नाहीये किंवा हा आपलं काहीच ऐकून घेणार नाहीये, तरीही कमीपणा घेऊन आपण त्यांना समजावायला जातो. यावर हि काही लोकं असं काही "explanation" देतात कि आपल्याला वाटायला लागतं कि, अरे हो ! हा चुकलाच नाहीये. आपलीच कुठेतरी गल्लत झाली . 'परिस्थिती' का 'काहीतरी' तशी होती म्हणून तो तसा वागला ! पण हा आपला 'भास' थोड्याच दिवसात धुकं विरून जावं तसा विरून जातो. जेव्हा तीच व्यक्ती तीच चूक , आपण सांगितल्यानंतरही , जशीच्या तशी परत करते ! आणि आपला होतो केवळ भ्रमनिरास ! मग आपल्याकडं दोन मार्ग असतात. एक म्हणजे परत आपला भ्रमनिरास करून घेणं