Posts

Showing posts from October, 2019

...

Image
एक विक्रेता होता. Specifically खेळणीविक्रेता. म्हणजे त्याच्याकडं सगळ्या प्रकारची खेळणी होती. जी लहान मुलांना खूप आवडतात, अशी सगळी खेळणी. या खेळण्यांमध्ये सगळं आलं हां. म्हणजे बघा ती छोटी छोटी घरं, मेकॅनो, लहान लहान गाड्या आणि गुल्लक - ते पैसे ठेवल्यावर कुत्रं बाहेर येऊन पैसे घेऊन आत जातं बघा- तसला गुल्लक वगैरे. आणि हा बाहुल्या पण होत्या हां. सगळ्या एकाच आकाराच्या पण वेगवेगळ्या रंग-रूपाच्या. तर असं सगळं होतं त्या विक्रेत्याकडं. पण त्या विक्रेत्याचा एकच problem होता. त्याच्याकडं दुकान नव्हतं. त्यामुळं त्याला या सगळ्या गोष्टी एका stall वरच विकाव्या लागायच्या. आता stall च असल्यामुळं त्याला रोजच्या रोज रात्री सगळं सामान एका box मध्ये ठेवावं लागायचं. ok? म्हणजे कसं की, रात्र झाली की, stall रिकामा करा, सगळं सामान box मध्ये टाका. Box गोडाऊन मध्ये टाका. घरी जा. परत दुसऱ्या दिवशी सकाळी box गोडाऊनमधनं घ्या. Stall ची साफसफाई करा. सगळं सामान परत मांडा. आणि हां, एक मिनिट. आपल्या विक्रेत्याची stall वर सामान मांडायची पण एक पद्धत होती बरं का! पद्धत म्हणजे त्यानं सगळ्या सामानाचं grouping केलेल

प्रेमाखातर

Image
        आजी आजोबांच्या उशाशीच बसल्या होत्या. आजोबांना आजचा पेपर वाचून दाखवत होत्या. आजकाल आजोबांचा आजार जास्तच बळावत होता. डॉक्टरांनी आता त्यांना सक्तीची bed-rest सांगितली होती. त्यामुळे आजींना आजोबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी लागत होती. आजींना आजोबांची अवस्था आता सहन होत नव्हती. पण, या आजारापुढे त्यांचा काही इलाज नव्हता. आजींना आजोबांची खूप काळजी घ्यावी लागत होती. आजोबांची खूप छोटी छोटी पथ्ये त्यांना अगदी कसोशीने पाळावी लागत होती. आजींना कळत होतं की, आजोबाही कंटाळलेत या सगळ्याला. पण, त्यांना लवकर बरं व्हायचं असेल तर, हे सगळं काटेकोरपणे करणं भागच होतं.         आजोबांना पण आजींची आपल्यामुळे होणारी फरफट समजत होती. आपल्यामुळे त्यांना सतत घराशीच बांधून राहावं लागतंय, याचं त्यांना वाईट वाटत होतं. पण, करणार काय? परिस्थितीपुढं कुणाचाच काही इलाज नव्हता. अगोदर आजी रोज क्लबात जायच्या. मैत्रिणींबरोबर थोडी मौज करून यायच्या. महिन्याकाठी एकदा क्लबतर्फे निघणाऱ्या छोट्या सहलींना जाऊन यायच्या. पण, आजोबांच्या आजारपणामुळं त्यांना आजोबांच्या औषधाच्या वेळा, नाश्ता-जेवणाच्या वेळा अगदी कसोशीने पाळाव्या ल