एकमेक

तिला माहित होतं का , कि तो तिच्याशी बोलल्याशिवाय झोपत नव्हता...
तिला माहित होतं का , कि तो नेहमी पांढरा रुमाल सोबत ठेवायचा , तिचा आवडता रंग म्हणून...
तिला माहित होतं का , कि तो नेहमी मोबाईल डाव्या खिशात ठेवायचा...
तिला माहित होतं का , कि तिला "त्याचा" सर्वात जास्त आवडलेला फोटो , त्याच्या फोन मध्ये तिचा "contact wallpaper" होता...
तिला माहित होतं का , कि त्याचा wallpaper बदलायचा , जेव्हा तिचा DP बदलायचा...
तिला माहित होतं का , कि तो त्याची आवड जिंकवी म्हणून , MATCH संपेपर्यंत FINGER CROSSED ठेवायचा , कितीही दुखलं तरी...
तिला माहित होतं का , कि तो तिच्या पहिल्या भेटीनंतर नेहमी डाव्या पायात पहिल्यांदा मोजे चढवायचा...
तिला माहित होतं का , कि त्याला वातावरण बदलांनी नाही तर , TENSIONS मुळे ताप यायचा...
तिला माहित होतं का , कि निरुद्देश भटकणं , अगदी दूर दूर पर्यंत , हा त्याचा आवडता छंद होता...
तिला माहित होतं का , कि तो महत्त्वाच्या कामाच्या अगोदर अर्धा तास कुणाशी , अगदी कुणाशीच बोलत नव्हता , त्याच्या श्रद्धेपायी...
तिला माहित होतं का , कि तो "ते" गाणं ऎकल्याशिवाय झोपत नसे , कारण एकच - तिचा Whatsapp Forward !!!
तिला माहित होतं का , कि त्याचं स्वप्न होतं - पांढरा आणि निळ्या रंगाचा बंगला , नदीकिनारी , कारण - तिची आवड...
तिला माहित होतं का , कि तो नाराज असताना बराच वेळ एकांतात घालवायचा , पण कितीही नाराज असला तरी तिचा CALL RECIEVE करायचा...कारण , ती नको नाराज व्हायला!!!
तिला माहित होतं का , त्याच्या PRIORITIES काय होत्या???
तिला माहित होतं का , त्याच्या उजव्या पायावरची खूण कसली होती...
तिला माहित होतं का , त्याच्या आयुष्यातलं तिचं महत्त्व , महत्त्व म्हणण्यापेक्षा तिची गरज...
तिला माहित होतं का , त्याच्या आनंदी असण्याचं सगळ्यात मोठ्ठं कारण "ती" होती...
तिला माहित होतं का , त्याला एकटं वाटायचं तेव्हा तो त्यांच्या , सोबत घालवलेल्या , कॅमेरात कैद केलेल्या क्षणांवर नजर फिरवायचा...
तिला माहित होती का त्याच्या आयुष्यातली वादळं , त्यानं अनुभवलेली , पण कधी न सांगितलेली...
तिला माहित होतं का , त्याचं तिच्या फोनची वाट पाहणं , अगदी मध्यरात्रीपर्यंत...
तिला खरंच माहित नव्हतं , का तिनं कधी जाणूनच नाही घेतलं... ?
तिला ते कधी जाणूनच नव्हतं घ्यायचं का आणखी काही ?
तिला यातलं काहीच माहित नव्हतं , तर खरंच तिचं त्याच्यावर प्रेम होतं का ?
तिला "तो" तरी संपूर्ण माहित होता का ?
जशी कि ती , त्याला...

©श्रेयस_जोशी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नातं

अडथळ्याची शर्यत

संवाद