Posts

...

Image
एक विक्रेता होता. Specifically खेळणीविक्रेता. म्हणजे त्याच्याकडं सगळ्या प्रकारची खेळणी होती. जी लहान मुलांना खूप आवडतात, अशी सगळी खेळणी. या खेळण्यांमध्ये सगळं आलं हां. म्हणजे बघा ती छोटी छोटी घरं, मेकॅनो, लहान लहान गाड्या आणि गुल्लक - ते पैसे ठेवल्यावर कुत्रं बाहेर येऊन पैसे घेऊन आत जातं बघा- तसला गुल्लक वगैरे. आणि हा बाहुल्या पण होत्या हां. सगळ्या एकाच आकाराच्या पण वेगवेगळ्या रंग-रूपाच्या. तर असं सगळं होतं त्या विक्रेत्याकडं. पण त्या विक्रेत्याचा एकच problem होता. त्याच्याकडं दुकान नव्हतं. त्यामुळं त्याला या सगळ्या गोष्टी एका stall वरच विकाव्या लागायच्या. आता stall च असल्यामुळं त्याला रोजच्या रोज रात्री सगळं सामान एका box मध्ये ठेवावं लागायचं. ok? म्हणजे कसं की, रात्र झाली की, stall रिकामा करा, सगळं सामान box मध्ये टाका. Box गोडाऊन मध्ये टाका. घरी जा. परत दुसऱ्या दिवशी सकाळी box गोडाऊनमधनं घ्या. Stall ची साफसफाई करा. सगळं सामान परत मांडा. आणि हां, एक मिनिट. आपल्या विक्रेत्याची stall वर सामान मांडायची पण एक पद्धत होती बरं का! पद्धत म्हणजे त्यानं सगळ्या सामानाचं grouping केलेल

प्रेमाखातर

Image
        आजी आजोबांच्या उशाशीच बसल्या होत्या. आजोबांना आजचा पेपर वाचून दाखवत होत्या. आजकाल आजोबांचा आजार जास्तच बळावत होता. डॉक्टरांनी आता त्यांना सक्तीची bed-rest सांगितली होती. त्यामुळे आजींना आजोबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी लागत होती. आजींना आजोबांची अवस्था आता सहन होत नव्हती. पण, या आजारापुढे त्यांचा काही इलाज नव्हता. आजींना आजोबांची खूप काळजी घ्यावी लागत होती. आजोबांची खूप छोटी छोटी पथ्ये त्यांना अगदी कसोशीने पाळावी लागत होती. आजींना कळत होतं की, आजोबाही कंटाळलेत या सगळ्याला. पण, त्यांना लवकर बरं व्हायचं असेल तर, हे सगळं काटेकोरपणे करणं भागच होतं.         आजोबांना पण आजींची आपल्यामुळे होणारी फरफट समजत होती. आपल्यामुळे त्यांना सतत घराशीच बांधून राहावं लागतंय, याचं त्यांना वाईट वाटत होतं. पण, करणार काय? परिस्थितीपुढं कुणाचाच काही इलाज नव्हता. अगोदर आजी रोज क्लबात जायच्या. मैत्रिणींबरोबर थोडी मौज करून यायच्या. महिन्याकाठी एकदा क्लबतर्फे निघणाऱ्या छोट्या सहलींना जाऊन यायच्या. पण, आजोबांच्या आजारपणामुळं त्यांना आजोबांच्या औषधाच्या वेळा, नाश्ता-जेवणाच्या वेळा अगदी कसोशीने पाळाव्या ल

नातं

Image
  एक दुहेरी कुटुंब. बाबा आणि मुलगी. तिची आई तिच्या लहानपणीच गेलेली. पण त्यानंतरची तिच्या आयुष्यातली आईची पोकळी बाबांनीच भरून काढलेली. बाबांसाठी मुलगी आणि मुलीसाठी बाबा इतकंच त्यांचं विश्व. त्यांच्या नात्यातही बरीच मोकळीक. इतकी की, मुलीच्या प्रियकराबद्दलही बाबांना माहिती! अर्थात ती आणि तो, आर्थिक आणि सगळ्याच बाबतीत, पूर्णपणे स्थिर असल्याने बाबांचीही त्यांच्या नात्याला मान्यता.   दोघंही  नोकरीत व्यस्त. मुलगी बाबांनंतर कामासाठी निघायची आणि बाबांनंतरच घरी यायची. त्यामुळे हे दिवस इतकं बोलणंच नाही व्हायचं त्यांचं. पण, त्यांना शनिवार रविवार मोकळा मिळायचा. त्यामुळं त्यांनी ठरवलं की, काहीही झालं तरी शनिवार पूर्णपणे एकमेकांसाठी द्यायचा. जे काही झालं असेल ते, शनिवारी, एकमेकांना सांगायला त्यांची एक खास जागा ठरलेली. ती म्हणजे, त्यांच्या घराजवळचा, सर्वदूर पसरलेला, शांत, रम्य समुद्रकिनारा. त्यांच्या सगळ्या कानगोष्टी या समुद्राला माहित होत्या. त्यांच्या सगळ्या आनंदी-दु:खी घटनांचा साक्षीदार होतं तो. त्यांचे प्रत्येक सुखसोहळे या समुद्राने साजरे केले होते तसंच, सगळ्या दु:खात तितक्याच गंभीर

हृदयां-तर

Image
        तशी त्याला वाचनाची आवड लहानपणापासूनच. लहानपणापासून  व.पू., मतकरी अगदी जवळचे. बोकील, पु.ल., शिरवळकर यांच्याशी सोयरिक. दररोज अग्रलेखाचं वाचन तर अगदी न चुकता. एकूणच  पुस्तकांशी माणसांपेक्षा मैत्री जास्त. रोज न चुकता काही ना काही वाचणारच. त्याशिवाय त्याला चैन पडत नसे. सगळे भले लेखक त्याचे आदर्श. पण, अभ्यासात मात्र तो अतिशय साधारण होता. यावरून घरच्यांची बोलणीही त्याला ऐकावी लागत. त्याच्या आजूबाजूच्या शेजारील मुलांशी त्याची अनेकदा तुलना होई. शेवटी काही म्हटलं तरी, हाताची पाचही बोटं सारखी नसतात. याला तो तरी काय करणार!?          तो पुढे कॉलेजला आला. व्यासंगात तरी खंड नव्हता. त्याचं कॉलेज म्हणजे आंतरमहाविद्यालयीन नाट्य-स्पर्धेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी कटू स्वप्न. या नाट्य-स्पर्धेत त्यांचा प्रचंड दबदबा. केवळ यांचं नाव ऐकूनच प्रतिस्पर्धी शांत होत. अशा कॉलेजमध्ये तो दाखल झाला.  होताहोता कलामंडळाशी त्याचा संपर्क आला. नाटक म्हणजे काय, याची वरवर माहिती अगोदर असल्यामुळे तो हळूहळू कलामंडळात रुळला. या एका शैक्षणिक वर्षात त्याला बऱ्यापैकी नाटकाचा अर्थ कळू लागला. नाटक म्हणजे काय, ते कसं

साक्षीदार

Image
        " मेरी धड़कने तुझे सुनाना चाहता था मैं...          तेरी आँखों की गहराईयो मे खोना चाहता था मै...         आज २१ ऑक्टोबर . त्या घटनेला आज पाच वर्ष पूर्ण झाली . म्हणायला तो एक अपघात होता , म्हणायला एक नकळत घडलेली चूक . पण अपराधी कोण , हे मला ठरवता येत नव्हतं . त्या दिवशी काय काय घडलं होतं , अजूनही मला लख्ख आठवतंय . काही वाटत नाही त्या घटनेबद्दल मला . अजूनही . त्या दिवशी असं का घडलं , हे ही नाही माहीत . घडलं ते चूक का बरोबर , नाही माहीत . पण , तो एक बचाव होता , समाजापासून , हे नक्की !                  माधवी . माझी Classmate . आधी मला ती अती हुशार , पुढं पुढं करणारी वाटायची . वर्गात उत्तरं देणारी , शिक्षकांच्या पुढं मागं करणारी . अभ्यास नेहमीच तयार . Assignments वेळच्या वेळी तपासलेल्या . टिपिकल First-bencher.                  एकदा , शेवटच्या वर्षाला , एका कार्यक्रमाच्या कारणास्तव तिची माझी ओळख झाली . मी कॉलेजच्या कल्चरल ग्रुपचा , तीन वर्षांपासून ACTIVE MEMBER होतो . त्यामुळे कॉलेजच्या एका छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शिक्षकांनी माझ्यावर सोपवली . एक मन

ती...

Image
          " चल . आम्ही निघतो . आजीला २ आठवडे बेड-रेस्ट सांगितली आहे . तिला जरा बरं वाटेपर्यंत मला आणि बाबांना तिथंच राहावं लागेल . तिकडचा जास्त विचार नको करू . तुझं हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे . अभ्यासावर लक्ष दे . इतकं जास्त नाहीये आजारपण ."           "........"           " अरे हो . तुला सांगितलं ना , तिकडं नको लक्ष देऊ . आहे आता ती बरी . तू अभ्यास व्यवस्थित कर . आणि हो , दूधाचं सांगितलंय मी . फक्त सकाळी त्याला आठवण करून दे . काकूंना सांगितलंय . त्या देतील रोज सकाळचा डबा . रात्रीचं त्यांना नाही जमणार . बघ तू . हां ? निघतो . "           ऐकत बसलेलो मी . सगळ्या सूचना . मुलगा कितीही मोठा होऊ दे , आई वडिलांसाठी तो नेहमीच ' बाळ ' असतो , या तत्त्वानुसार त्या सूचना चालू होत्या . शेवटी निघाले ते . गावी . २ आठवडे तरी आता मला माझ्या मनाप्रमाणे वागायची मुभा होती . त्यांच्या सूचना चालू असताना , मी मनातल्या मनात , या २ आठवड्यांची " TO-DO " लिस्ट तयार करत होतो . अभ्यास तर होताच . या काळात बघायचे पिक्चर , नाटकं , football चे रात्री चालणारे सामने ,

चक्र

Image
" हॅलो मोहिते, आहात तिथून लवकर निघा. अजून एक खून झालाय. साखळीत अजून एका मुलीच्या मृतदेहाची भर पडलीये. साहेबांनी ताबडतोब नाकाबंदीची ऑर्डर दिली आहे. त्वरित निघा."         मोहिते लगेच पोशाख चढवून चौकीकडे निघाले. काय करावं समजत नव्हतं. दोन दिवसाआड एका मुलीचा बळी जात होता. तो ही विनाकारण. कोण करतंय हे सगळं, त्यामागचा त्याचा हेतू काय, कोणाच्या आदेशानुसार हे सगळं चाललंय काहीच समजायला मार्ग नव्हता. पोलिसांनी गेला एक महिना रात्रीचा दिवस करून आरोपीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. पण, काहीच हाती लागत नव्हतं. आरोपी अतिशय चतुर होता. तो कोणतेच पुरावे पाठीमागे सोडत नव्हता. त्यानं शहरातल्या केवळ मध्यमवयीन तरुणींनाच लक्ष्य केलं होतं. का? कशासाठी? तरुणीच का? काहीच कळायला मार्ग नव्हता. गेला एक महिना मोहिते आणि टीमचं लक्ष्य एकच होतं, तो सिरीयल किलर ! त्याला आता काही करून....         हे सगळे विचार चालू असतानाच मोहितेंना वाटेत, एका बंगल्यासमोर आत जाण्याच्या स्थितीत उभी असलेली पांढरीशुभ्र SUV उभी असलेली दिसली. तसा मोहितेंच्या घरासमोरील, मुख्य रस्त्याला लागेपर्यंतचा रस्ता, एकेरी वाहतुकीसाठी