अंतरातली अंतरे...

__प्रवास__ तू आणि मी... घडीचे प्रवासी... अनोळखी होतो एकमेकांना सुरुवातीला... भेटलो असेच आपण एकदा मैत्रीच्या थांब्यावर... आणि एक सुखेनैव प्रवास सुरु झाला... तुझा आणि माझा... वाटेत काही प्रवासीही भेटले... चांगले , वाईट , हव्यासी , स्वार्थी... सर्वांशी जुळवून घेत आपला आनंदी प्रवास सुरूच होता... विश्वासाचा , आपुलकीचा , काळजीचा... पण... प्रेमाच्या थांब्याअगोदरच निघून गेलीस तू , न सांगता... मला या प्रवाशांसोबत एकटं सोडून... माझा प्रवास सुरूच आहे... तुझ्या शोधात... तू मिळेपर्यंत... __________________________________________ __स्वप्न__ स्वप्नं पडायची मला तशी अधून मधून... पण तू आलीस , आणि त्या स्वप्नांना अर्थ मिळाला... तुझ्या सहवासाने त्या स्वप्नांत नवीन रंग भरले गेले... स्वप्नांच्या नवनवीन लहरी जाणवू लागल्या मला... तुझ्या एक एक प्रतिक्रियेमागं... एक दिवस धाडस करून विचारायचं ठरवलं तुझ्या स्वप्नांना , माझ्या स्वप्नात सामावण्यासाठी... मात्र , तू तुझ्या स्वप्नाविषयी सांगितलंस मला... त्यानंतर मला स्वप्नच नाही पडलं... __________________________...