काय करायचं ह्यांचं ?

बरेच दिवस बोलायचं होतं मंडळी , पण वेळ मिळत नव्हता ☺
तर , आपल्या आयुष्यात आपल्याला काही माणसं अशी भेटतात कि आपण त्यांना सुधरवूच शकत नाही.
आपल्याला तरीही त्यांच्याबद्दल 'आपुलकी' वाटत असते.
आता माणूस आहे म्हटल्यावर चुकणारच !
तसेच हे हि लोक काहीवेळा(?) चुकतात(??) !
म्हणून 'आपुलकी'पोटी आपण त्यांना समजवायला जातो.
त्यांना त्यांची चूक निदर्शनास आणून देण्याचा वायफळ(!) प्रयत्न करतो.
आपल्याला माहित असतं कि हा सुधारणाऱ्यातला नाहीये किंवा हा आपलं काहीच ऐकून घेणार नाहीये, तरीही कमीपणा घेऊन आपण त्यांना समजावायला जातो.
यावर हि काही लोकं असं काही "explanation" देतात कि आपल्याला वाटायला लागतं कि, अरे हो ! हा चुकलाच नाहीये.
आपलीच कुठेतरी गल्लत झाली .
'परिस्थिती' का 'काहीतरी' तशी होती म्हणून तो तसा वागला !
पण हा आपला 'भास' थोड्याच दिवसात धुकं विरून जावं तसा विरून जातो.
जेव्हा तीच व्यक्ती तीच चूक , आपण सांगितल्यानंतरही , जशीच्या तशी परत करते !
आणि आपला होतो केवळ भ्रमनिरास !
मग आपल्याकडं दोन मार्ग असतात.
एक म्हणजे परत आपला भ्रमनिरास करून घेणं किंवा दुसरा अशा व्यक्तींपासून चार हात लांब राहणं, त्यांच्याशी संभाषण कमी करणं.
आता कुणालाही आपला पोपट झालेला आवडत नाही.
त्यामुळं जवळपास सगळेच सोयीस्कररित्या दुसरा मार्ग निवडतात.
आणि त्या "काही व्यक्तीं'"ना वाटत राहतं कि आपला जय झाला ☺
वास्तव त्यांना कधी समजतच नाही आणि ते आपल्याच "विजया"च्या दुनियेत जगत राहतात.... अखेरपर्यंत ...
तेव्हा कोणी सांगू शकेल का अशा "विजयी" जनांना वास्तवात आणण्याचा मार्ग  ?

ता.क. (वरील पोस्टशी संबंधित नाही)
Facebook , Instagram , Hike वर पोस्ट टाकून स्वतःच "like" करणाऱ्यांना २१ तोफांची मजबूत सलामी ...

©श्रेयस_जोशी

Comments

Popular posts from this blog

नातं

अडथळ्याची शर्यत

संवाद