नातं

एक दुहेरी कुटुंब. बाबा आणि मुलगी. तिची आई तिच्या लहानपणीच गेलेली. पण त्यानंतरची तिच्या आयुष्यातली आईची पोकळी बाबांनीच भरून काढलेली. बाबांसाठी मुलगी आणि मुलीसाठी बाबा इतकंच त्यांचं विश्व. त्यांच्या नात्यातही बरीच मोकळीक. इतकी की, मुलीच्या प्रियकराबद्दलही बाबांना माहिती! अर्थात ती आणि तो, आर्थिक आणि सगळ्याच बाबतीत, पूर्णपणे स्थिर असल्याने बाबांचीही त्यांच्या नात्याला मान्यता. दोघंही नोकरीत व्यस्त. मुलगी बाबांनंतर कामासाठी निघायची आणि बाबांनंतरच घरी यायची. त्यामुळे हे दिवस इतकं बोलणंच नाही व्हायचं त्यांचं. पण, त्यांना शनिवार रविवार मोकळा मिळायचा. त्यामुळं त्यांनी ठरवलं की, काहीही झालं तरी शनिवार पूर्णपणे एकमेकांसाठी द्यायचा. जे काही झालं असेल ते, शनिवारी, एकमेकांना सांगायला त्यांची एक खास जागा ठरलेली. ती म्हणजे, त्यांच्या घराजवळचा, सर्वदूर पसरलेला, शांत, रम्य समुद्रकिनारा. त्यांच्या सगळ्या कानगोष्टी या समुद्राला माहित होत्या. त्यांच्या सगळ्या आनंदी-दु:खी घटनांचा साक्षीदार होतं तो. त्यांचे प्रत्येक सुखसोहळे या समुद्राने साजरे केले होते तसंच, सगळ्या दु:खात ...