साक्षीदार

" मेरी धड़कने तुझे सुनाना चाहता था मैं... तेरी आँखों की गहराईयो मे खोना चाहता था मै... आज २१ ऑक्टोबर . त्या घटनेला आज पाच वर्ष पूर्ण झाली . म्हणायला तो एक अपघात होता , म्हणायला एक नकळत घडलेली चूक . पण अपराधी कोण , हे मला ठरवता येत नव्हतं . त्या दिवशी काय काय घडलं होतं , अजूनही मला लख्ख आठवतंय . काही वाटत नाही त्या घटनेबद्दल मला . अजूनही . त्या दिवशी असं का घडलं , हे ही नाही माहीत . घडलं ते चूक का बरोबर , नाही माहीत . पण , तो एक बचाव होता , समाजापासून , हे नक्की ! माधवी . माझी Classmate . आधी मला ती अती हुशार , पुढं पुढं करणारी वाटायची . वर्गात उत्तरं देणारी , शिक्षकांच्या पुढं मागं करणारी . अभ्यास नेहमीच तयार . Assignments वेळच्या वेळी तपासलेल्या . टिपिकल First-bencher. एकदा , शेवटच्या वर्षाला , एका कार्यक्रमाच्या कारणास्तव तिची माझी ओळख झाली . मी कॉलेजच्या कल्च...