तुम्हाला हवंय की टेस्टिंग यशस्वी झालं
(सूचना: जर तुम्ही गोष्टीची सुरुवात न वाचता थेट या पानावर आला असाल तर थांबा. ही एक इमर्सिव्ह एक्सपेरियन्स गोष्ट आहे. ती पहिल्यापासून वाचण्यासाठी कृपया इथं भेट द्या. साकेतची गोष्ट <- क्लिक करा. ) (आणि जर तुम्ही तुमचा पर्याय निवडून या पानावर आला असाल तर कृपया आपला इमर्सिव्ह एक्सपेरियन्स कंटिन्यू करा.) साकेतनं त्याचं आणि मैथिलीचं पोर्टल दोघांच्या मोबाईलमधल्या मॅप्सला लिंक केलं. "मैथिली आत ये आता." "झालं का तुझं सगळं नक्की? मागचा अर्धा तास मला बाहेर थांबवून ठेवलंयस." "झालं माझं डेकोरेशन. ये आता." मैथिली आत आली. त्यानं पोर्टल तिच्या हातात दिलं आणि म्हणाला, "हॅप्पी ऍनिव्हर्सरी!" मैथिलीला काहीच कळेना. तिला आजूबाजूला नेहमीसारखीच रूम दिसत होती. "हॅप्पी ऍनिव्हर्सरी, साकेत. मी अर्धा तास बाहेर होते. मला वाटलं बरंच काही डेकोरेशन असेल. इथं ना फुगे आहेत, ना फुलं." त्यानं तिला शांतपणे आपण काय करतोय ते बघायला सांगितलं. मग तिच्या आणि स्वतःच्या मोबाईलच्या गूगल मॅप्समध्ये ताजचा स्ट्रीट व्ह्यू सिलेक्ट केला. स्ट्रीट व्ह्यूद्वारे फिरत फिरत ते कॉरिडॉ...