Posts

स्वप्नातलं सत्य

"काही समजलं का पत्रिका बघून? का होत असेल असं?" हृषीकेश ज्योतिषाचार्य भार्गवांसमोर बसला होता. त्याचे घरगुती गुरुजी. हृषीकेशच्या घरचे भार्गवांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करत नसत. आज हृषीकेशचं वैष्णव घराणं एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराणं म्हणून समाजात वावरत होतं. असं असलं तरीही वैष्णवांकडे अगदी छोट्या छोट्या कामात भार्गव गुरुजींचा सल्ला नेहमीच विचारात घेतला जात असे. तरीही हृषीकेशचा मात्र ज्योतिष विद्येवर अजिबात विश्वास नव्हता. त्याला वाटायचं की, ग्रह-नक्षत्र-तारे वगैरे बघत बसण्यापेक्षा, कष्टावर विश्वास ठेऊन स्वतःच्या हाताने नशीब घडवायचं असतं. यावरून त्याची नेहमीच घरच्यांशी मतमतांतरे होत. आज मात्र घरच्यांच्या सांगण्यावरून, केवळ त्यांच्या समाधानासाठी तो भार्गवांना भेटायला आला होता. पत्रिका भार्गवांसमोर ठेऊन बराच वेळ झाला तरी ते काही बोलत नाही म्हणून न राहवून त्यानं प्रश्न विचारला. भार्गवांनी मान वर करून त्याच्याकडं बघितलं आणि मानेनंच थोडा वेळ थांबायचा इशारा केला. हृषीकेश हाताचे चाळे करत भार्गवांचं पत्रिका वाचन कधी संपतं याची वाट बघत बसला. थोड्या वेळाने भार्गवांनी शांततेचा भंग करत...

तुम्हाला हवंय आईबाबांचं ऐकून लग्न करावं

  (सूचना:  जर तुम्ही गोष्टीची सुरुवात न वाचता थेट या पानावर आला असाल तर थांबा. ही एक इंटरॅक्टिव्ह एक्सपेरियन्स गोष्ट आहे. ती पहिल्यापासून वाचण्यासाठी कृपया इथं भेट द्या. साकेतची गोष्ट <- क्लिक करा. )  (आणि जर तुम्ही तुमचा पर्याय निवडून या पानावर आला असाल तर कृपया आपला इमर्सिव्ह एक्सपेरियन्स कंटिन्यू करा.)  ‘Brief history of time’ वाचून झाल्यापासून साकेतच्या डोक्यात नवनवीन कल्पना घोळायला लागल्या. त्याला त्या लगेच प्रॅक्टिस मध्ये आणाव्याश्या वाटू लागल्या. त्याला टाईम ट्रॅव्हल पेक्षा पण ‘porting’ ही कन्सेप्ट प्रत्यक्षात आणावीशी वाटू लागली. ‘Porting’ म्हणजे सोप्प्या भाषेत सदेह एका जागेवरून दुसऱ्या जागेवर क्षणार्धात जाणे. ‘Porting’चा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा प्रवासाचा वेळ, खर्च आणि क्षीण वाचतो. यावर त्याला स्वतःहून काम करायचं होतं आणि हे आगळंवेगळं फिचर गूगल मॅप्स मध्ये ऍड करून मानाचं पेटंटसुद्धा घ्यायचं होतं. सोबत ऑफिसचं प्रोजेक्टचं काम चालू होतंच.  अशातच जॉबला लागून वर्ष होताच आईबाबांनी लग्नाची भुणभुण चालू केली. "साकेत, आजच मामीने तीन चार चांगली ...

तुम्हाला हवंय करिअर वर फोकस करावा

  (सूचना:  जर तुम्ही गोष्टीची सुरुवात न वाचता थेट या पानावर आला असाल तर थांबा. ही एक इंटरॅक्टिव्ह एक्सपेरियन्स गोष्ट आहे. ती पहिल्यापासून वाचण्यासाठी कृपया इथं भेट द्या. साकेतची गोष्ट <- क्लिक करा. )  (आणि जर तुम्ही तुमचा पर्याय निवडून या पानावर आला असाल तर कृपया आपला इमर्सिव्ह एक्सपेरियन्स कंटिन्यू करा.)      ' Brief history of time’ वाचून झाल्यापासून साकेतच्या डोक्यात नवनवीन कल्पना घोळायला लागल्या. त्याला त्या लगेच प्रॅक्टिस मध्ये आणाव्याश्या वाटू लागल्या. त्याला टाईम ट्रॅव्हल पेक्षा पण ‘porting’ ही कन्सेप्ट प्रत्यक्षात आणावीशी वाटू लागली. ‘Porting’ म्हणजे सोप्प्या भाषेत सदेह एका जागेवरून दुसऱ्या जागेवर क्षणार्धात जाणे. ‘Porting’चा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा प्रवासाचा वेळ, खर्च आणि क्षीण वाचतो. यावर त्याला स्वतःहून काम करायचं होतं आणि हे आगळंवेगळं फिचर गूगल मॅप्स मध्ये ऍड करून मानाचं पेटंटसुद्धा घ्यायचं होतं. सोबत ऑफिसचं प्रोजेक्टचं काम चालू होतंच.                अशातच जॉबला लागून वर्ष होत...