Posts

हृदयां-तर

Image
        तशी त्याला वाचनाची आवड लहानपणापासूनच. लहानपणापासून  व.पू., मतकरी अगदी जवळचे. बोकील, पु.ल., शिरवळकर यांच्याशी सोयरिक. दररोज अग्रलेखाचं वाचन तर अगदी न चुकता. एकूणच  पुस्तकांशी माणसांपेक्षा मैत्री जास्त. रोज न चुकता काही ना काही वाचणारच. त्याशिवाय त्याला चैन पडत नसे. सगळे भले लेखक त्याचे आदर्श. पण, अभ्यासात मात्र तो अतिशय साधारण होता. यावरून घरच्यांची बोलणीही त्याला ऐकावी लागत. त्याच्या आजूबाजूच्या शेजारील मुलांशी त्याची अनेकदा तुलना होई. शेवटी काही म्हटलं तरी, हाताची पाचही बोटं सारखी नसतात. याला तो तरी काय करणार!?          तो पुढे कॉलेजला आला. व्यासंगात तरी खंड नव्हता. त्याचं कॉलेज म्हणजे आंतरमहाविद्यालयीन नाट्य-स्पर्धेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी कटू स्वप्न. या नाट्य-स्पर्धेत त्यांचा प्रचंड दबदबा. केवळ यांचं नाव ऐकूनच प्रतिस्पर्धी शांत होत. अशा कॉलेजमध्ये तो दाखल झाला.  होताहोता कलामंडळाशी त्याचा संपर्क आला. नाटक म्हणजे काय, याची वरवर माहिती अगोदर असल्यामुळे तो हळूहळू कलामंडळात रुळला. या एका शैक्षणिक वर्षात त्याल...

साक्षीदार

Image
        " मेरी धड़कने तुझे सुनाना चाहता था मैं...          तेरी आँखों की गहराईयो मे खोना चाहता था मै...         आज २१ ऑक्टोबर . त्या घटनेला आज पाच वर्ष पूर्ण झाली . म्हणायला तो एक अपघात होता , म्हणायला एक नकळत घडलेली चूक . पण अपराधी कोण , हे मला ठरवता येत नव्हतं . त्या दिवशी काय काय घडलं होतं , अजूनही मला लख्ख आठवतंय . काही वाटत नाही त्या घटनेबद्दल मला . अजूनही . त्या दिवशी असं का घडलं , हे ही नाही माहीत . घडलं ते चूक का बरोबर , नाही माहीत . पण , तो एक बचाव होता , समाजापासून , हे नक्की !                  माधवी . माझी Classmate . आधी मला ती अती हुशार , पुढं पुढं करणारी वाटायची . वर्गात उत्तरं देणारी , शिक्षकांच्या पुढं मागं करणारी . अभ्यास नेहमीच तयार . Assignments वेळच्या वेळी तपासलेल्या . टिपिकल First-bencher.                  एकदा , शेवटच्या वर्षाला , एका कार्यक्रमाच्या कारणास्तव तिची माझी ओळख झाली . मी कॉलेजच्या कल्च...

ती...

Image
          " चल . आम्ही निघतो . आजीला २ आठवडे बेड-रेस्ट सांगितली आहे . तिला जरा बरं वाटेपर्यंत मला आणि बाबांना तिथंच राहावं लागेल . तिकडचा जास्त विचार नको करू . तुझं हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे . अभ्यासावर लक्ष दे . इतकं जास्त नाहीये आजारपण ."           "........"           " अरे हो . तुला सांगितलं ना , तिकडं नको लक्ष देऊ . आहे आता ती बरी . तू अभ्यास व्यवस्थित कर . आणि हो , दूधाचं सांगितलंय मी . फक्त सकाळी त्याला आठवण करून दे . काकूंना सांगितलंय . त्या देतील रोज सकाळचा डबा . रात्रीचं त्यांना नाही जमणार . बघ तू . हां ? निघतो . "           ऐकत बसलेलो मी . सगळ्या सूचना . मुलगा कितीही मोठा होऊ दे , आई वडिलांसाठी तो नेहमीच ' बाळ ' असतो , या तत्त्वानुसार त्या सूचना चालू होत्या . शेवटी निघाले ते . गावी . २ आठवडे तरी आता मला माझ्या मनाप्रमाणे वागायची मुभा होती . त्यांच्या सूचना चालू असताना , मी मनातल्या मनात , या २ आठवड्यांची " TO-DO " लिस्ट तयार करत होतो . अभ्यास तर होताच . या काळात बघायचे ...

चक्र

Image
" हॅलो मोहिते, आहात तिथून लवकर निघा. अजून एक खून झालाय. साखळीत अजून एका मुलीच्या मृतदेहाची भर पडलीये. साहेबांनी ताबडतोब नाकाबंदीची ऑर्डर दिली आहे. त्वरित निघा."         मोहिते लगेच पोशाख चढवून चौकीकडे निघाले. काय करावं समजत नव्हतं. दोन दिवसाआड एका मुलीचा बळी जात होता. तो ही विनाकारण. कोण करतंय हे सगळं, त्यामागचा त्याचा हेतू काय, कोणाच्या आदेशानुसार हे सगळं चाललंय काहीच समजायला मार्ग नव्हता. पोलिसांनी गेला एक महिना रात्रीचा दिवस करून आरोपीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. पण, काहीच हाती लागत नव्हतं. आरोपी अतिशय चतुर होता. तो कोणतेच पुरावे पाठीमागे सोडत नव्हता. त्यानं शहरातल्या केवळ मध्यमवयीन तरुणींनाच लक्ष्य केलं होतं. का? कशासाठी? तरुणीच का? काहीच कळायला मार्ग नव्हता. गेला एक महिना मोहिते आणि टीमचं लक्ष्य एकच होतं, तो सिरीयल किलर ! त्याला आता काही करून....         हे सगळे विचार चालू असतानाच मोहितेंना वाटेत, एका बंगल्यासमोर आत जाण्याच्या स्थितीत उभी असलेली पांढरीशुभ्र SUV उभी असलेली दिसली. तसा मोहितेंच्या घरासम...

संवाद

Image
तू माझी नक्कीच आठवण काढशील... तुला माझी नक्कीच आठवण येईल , जेव्हा तू एकटा असशील... तुला मी नक्की आठवेन , जेव्हा तुला सगळ्याचा कंटाळा येईल आणि तू उदास होशील... तुला मी नक्की आठवेन , जेव्हा नवनवीन जबाबदाऱ्या,नकोशा पण जरुरी, तुझ्या अंगावर पडतील... जगाला खोटं खोटं हसून उत्तरे देताना माझ्यातली निरागसता नक्की आठवेल तुला... डोळ्यातल्या अश्रूंना जबरदस्तीनं थोपवताना, जरूर आठवेल तुला माझ्यातला मोकळेपणा... स्वातंत्र्य तर तुला मिळेलच, नक्कीच, पण माझ्यातल्या स्वातंत्र्याची वेगळी मजा तुला नक्की जाणवेल... स्वतंत्र जगताना माझ्यासारखं बांधील, पण मोकळेपणानं जगावं असं वाटेल तुला, पण तुझा नाईलाज असेल... त्यावेळी फक्त मी आठवत राहीन तुला... तू अगदी जग फिरून येशील, सगळ्या सगळ्या वाहनात बसशील, मजा करशील, पण माझ्यासोबत जमिनीवर, गुडघ्यावर बसून, जोरजोरात फिरवलेली गाडी तुला नक्कीच त्यापेक्षा जास्त आनंद देईल... तू पावसातून रेनकोट घालून जाताना तुला नक्की आठवेल, माझ्यासोबतचं पावसात मनसोक्त भिजणं, चिखल उडवत बेधुंद नाचणं... जगाशी स्वार्थासाठी खोटं बोलताना तुला नक्की जाणवेल, माझी निरागसता, माझ्य...

दुभंग

Image
सूर्य तळपत होता . नेहमीप्रमाणेच . नुसती आग ओकत होता . आगीच्या तप्त गोळ्यांचा वर्षाव करत होता . संपूर्ण वातावरण तापलं होतं . नुसती आग-आग सगळीकडं ! सभोवार तापलं होतं . सूर्याला कशाचीच फिकीर नव्हती . फिकीर म्हणण्यापेक्षा त्याला कशाची पर्वा नव्हती . जणू तो त्याला नेमून दिलेलं काम चोख बजावत होता , 'तिला' तापवण्याचं ! तिच्याकडेही काही पर्यायच नव्हता . ती काही करू शकत नव्हती . सुर्याविरुद्ध कुणाकडे तक्रार , म्हणजे अगदीच अशक्य ! आणि ती सूर्याला विनवणी देखील करू नव्हती शकत , पारा जरा कमी करण्याविषयी ! काय करणार , तिचा स्थायीभाव , 'सोशिकता' ! जे वाट्याला आलं ते निमूटपणे सहन करायचं . जे होईल ते सोसत राहायचं . कुणाकडे कसली विनवणी नाही करायची , कुणाची कुणाकडे तक्रार नाही करायची , अजिबात . जे होईल, ते होईल . म्हणून, ती निमूटपणे सूर्याचा तो अग्निवर्षाव सहन करत होती . तिला नव्याने तडे जात होते . दिवसागणिक अधिक कोरडी होत होती ती . तरुमित्रांनी तर कधीच हार मानली होती . त्यात आणखी भर म्हणजे, त्या सूर्याने वाऱ्यालाही आपल्या पक्षात वळवून घेतलं . आता, सूर्य वाऱ्याशी हात मिळवून तिला अजून त्...

हे ही दिवस जातील...

Image
          नुकताच १२वीचा निकाल लागला. कोणी ९०% च्या वर मिळवले तर , कोणी अगदीच ३५. कोणाच्या घरी आनंदसोहळा , तर कोणाच्या घरी मौनव्रत. काही जण नापासही झाले. त्यांच्या घरचं वातावरण तर नकोच विचारायला नको. तर , असं संमिश्र वातावरण सगळीकडं निकालानंतर. निकाल म्हटलं की , असं वातावरण ठरलेलंच. निकाल म्हणजे फक्त tension , त्यात आणि बोर्डाचा म्हणजे संपलंच. आजकालची जीवघेणी स्पर्धाच या tension चं मूळ. त्यात आणि निकालावरच पुढील प्रवेशाची स्पर्धा ठरलेली. त्यामुळं tension मध्ये अजूनच वाढ! निकाल म्हटलं की एक तणाव पसरलेला असतो वातावरणात. आजकाल निकालावरच admission च्या categories ठरतात ना. साधारण ८५ च्या वर म्हणजे सायन्स , अभियांत्रिकी , वैद्यकीय . त्या खालोखाल कॉमर्स , आणि मग आर्टस्! असा हा उतरता क्रम. हे झालं पास होणाऱ्यांविषयी. काही जणांना हा अडथळा पार नाही करता येत. मग त्यांना घरात , घराबाहेर अनेक टोमण्यांना सामोरं जावं लागतं. काही जण मानसिकदृष्ट्या कमजोर असतात , असे आत्महत्येचा भीषण मार्ग निवडतात. आजही निकालानंतरच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे.  ...