Posts

चक्र

Image
" हॅलो मोहिते, आहात तिथून लवकर निघा. अजून एक खून झालाय. साखळीत अजून एका मुलीच्या मृतदेहाची भर पडलीये. साहेबांनी ताबडतोब नाकाबंदीची ऑर्डर दिली आहे. त्वरित निघा."         मोहिते लगेच पोशाख चढवून चौकीकडे निघाले. काय करावं समजत नव्हतं. दोन दिवसाआड एका मुलीचा बळी जात होता. तो ही विनाकारण. कोण करतंय हे सगळं, त्यामागचा त्याचा हेतू काय, कोणाच्या आदेशानुसार हे सगळं चाललंय काहीच समजायला मार्ग नव्हता. पोलिसांनी गेला एक महिना रात्रीचा दिवस करून आरोपीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. पण, काहीच हाती लागत नव्हतं. आरोपी अतिशय चतुर होता. तो कोणतेच पुरावे पाठीमागे सोडत नव्हता. त्यानं शहरातल्या केवळ मध्यमवयीन तरुणींनाच लक्ष्य केलं होतं. का? कशासाठी? तरुणीच का? काहीच कळायला मार्ग नव्हता. गेला एक महिना मोहिते आणि टीमचं लक्ष्य एकच होतं, तो सिरीयल किलर ! त्याला आता काही करून....         हे सगळे विचार चालू असतानाच मोहितेंना वाटेत, एका बंगल्यासमोर आत जाण्याच्या स्थितीत उभी असलेली पांढरीशुभ्र SUV उभी असलेली दिसली. तसा मोहितेंच्या घरासम...

संवाद

Image
तू माझी नक्कीच आठवण काढशील... तुला माझी नक्कीच आठवण येईल , जेव्हा तू एकटा असशील... तुला मी नक्की आठवेन , जेव्हा तुला सगळ्याचा कंटाळा येईल आणि तू उदास होशील... तुला मी नक्की आठवेन , जेव्हा नवनवीन जबाबदाऱ्या,नकोशा पण जरुरी, तुझ्या अंगावर पडतील... जगाला खोटं खोटं हसून उत्तरे देताना माझ्यातली निरागसता नक्की आठवेल तुला... डोळ्यातल्या अश्रूंना जबरदस्तीनं थोपवताना, जरूर आठवेल तुला माझ्यातला मोकळेपणा... स्वातंत्र्य तर तुला मिळेलच, नक्कीच, पण माझ्यातल्या स्वातंत्र्याची वेगळी मजा तुला नक्की जाणवेल... स्वतंत्र जगताना माझ्यासारखं बांधील, पण मोकळेपणानं जगावं असं वाटेल तुला, पण तुझा नाईलाज असेल... त्यावेळी फक्त मी आठवत राहीन तुला... तू अगदी जग फिरून येशील, सगळ्या सगळ्या वाहनात बसशील, मजा करशील, पण माझ्यासोबत जमिनीवर, गुडघ्यावर बसून, जोरजोरात फिरवलेली गाडी तुला नक्कीच त्यापेक्षा जास्त आनंद देईल... तू पावसातून रेनकोट घालून जाताना तुला नक्की आठवेल, माझ्यासोबतचं पावसात मनसोक्त भिजणं, चिखल उडवत बेधुंद नाचणं... जगाशी स्वार्थासाठी खोटं बोलताना तुला नक्की जाणवेल, माझी निरागसता, माझ्य...

दुभंग

Image
सूर्य तळपत होता . नेहमीप्रमाणेच . नुसती आग ओकत होता . आगीच्या तप्त गोळ्यांचा वर्षाव करत होता . संपूर्ण वातावरण तापलं होतं . नुसती आग-आग सगळीकडं ! सभोवार तापलं होतं . सूर्याला कशाचीच फिकीर नव्हती . फिकीर म्हणण्यापेक्षा त्याला कशाची पर्वा नव्हती . जणू तो त्याला नेमून दिलेलं काम चोख बजावत होता , 'तिला' तापवण्याचं ! तिच्याकडेही काही पर्यायच नव्हता . ती काही करू शकत नव्हती . सुर्याविरुद्ध कुणाकडे तक्रार , म्हणजे अगदीच अशक्य ! आणि ती सूर्याला विनवणी देखील करू नव्हती शकत , पारा जरा कमी करण्याविषयी ! काय करणार , तिचा स्थायीभाव , 'सोशिकता' ! जे वाट्याला आलं ते निमूटपणे सहन करायचं . जे होईल ते सोसत राहायचं . कुणाकडे कसली विनवणी नाही करायची , कुणाची कुणाकडे तक्रार नाही करायची , अजिबात . जे होईल, ते होईल . म्हणून, ती निमूटपणे सूर्याचा तो अग्निवर्षाव सहन करत होती . तिला नव्याने तडे जात होते . दिवसागणिक अधिक कोरडी होत होती ती . तरुमित्रांनी तर कधीच हार मानली होती . त्यात आणखी भर म्हणजे, त्या सूर्याने वाऱ्यालाही आपल्या पक्षात वळवून घेतलं . आता, सूर्य वाऱ्याशी हात मिळवून तिला अजून त्...

हे ही दिवस जातील...

Image
          नुकताच १२वीचा निकाल लागला. कोणी ९०% च्या वर मिळवले तर , कोणी अगदीच ३५. कोणाच्या घरी आनंदसोहळा , तर कोणाच्या घरी मौनव्रत. काही जण नापासही झाले. त्यांच्या घरचं वातावरण तर नकोच विचारायला नको. तर , असं संमिश्र वातावरण सगळीकडं निकालानंतर. निकाल म्हटलं की , असं वातावरण ठरलेलंच. निकाल म्हणजे फक्त tension , त्यात आणि बोर्डाचा म्हणजे संपलंच. आजकालची जीवघेणी स्पर्धाच या tension चं मूळ. त्यात आणि निकालावरच पुढील प्रवेशाची स्पर्धा ठरलेली. त्यामुळं tension मध्ये अजूनच वाढ! निकाल म्हटलं की एक तणाव पसरलेला असतो वातावरणात. आजकाल निकालावरच admission च्या categories ठरतात ना. साधारण ८५ च्या वर म्हणजे सायन्स , अभियांत्रिकी , वैद्यकीय . त्या खालोखाल कॉमर्स , आणि मग आर्टस्! असा हा उतरता क्रम. हे झालं पास होणाऱ्यांविषयी. काही जणांना हा अडथळा पार नाही करता येत. मग त्यांना घरात , घराबाहेर अनेक टोमण्यांना सामोरं जावं लागतं. काही जण मानसिकदृष्ट्या कमजोर असतात , असे आत्महत्येचा भीषण मार्ग निवडतात. आजही निकालानंतरच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे.  ...

अंतरातली अंतरे...

Image
__प्रवास__ तू आणि मी... घडीचे प्रवासी... अनोळखी होतो एकमेकांना सुरुवातीला... भेटलो असेच आपण एकदा मैत्रीच्या थांब्यावर... आणि एक सुखेनैव प्रवास सुरु झाला... तुझा आणि माझा... वाटेत काही प्रवासीही भेटले... चांगले , वाईट , हव्यासी , स्वार्थी... सर्वांशी जुळवून घेत आपला आनंदी प्रवास सुरूच होता... विश्वासाचा , आपुलकीचा , काळजीचा... पण... प्रेमाच्या थांब्याअगोदरच निघून गेलीस तू , न सांगता... मला या प्रवाशांसोबत एकटं सोडून... माझा प्रवास सुरूच आहे... तुझ्या शोधात... तू मिळेपर्यंत... __________________________________________ __स्वप्न__ स्वप्नं पडायची मला तशी अधून मधून... पण तू आलीस , आणि त्या स्वप्नांना अर्थ मिळाला... तुझ्या सहवासाने त्या स्वप्नांत नवीन रंग भरले गेले... स्वप्नांच्या नवनवीन लहरी जाणवू लागल्या मला... तुझ्या एक एक प्रतिक्रियेमागं... एक दिवस धाडस करून विचारायचं ठरवलं तुझ्या स्वप्नांना , माझ्या स्वप्नात सामावण्यासाठी... मात्र , तू तुझ्या स्वप्नाविषयी सांगितलंस मला... त्यानंतर मला स्वप्नच नाही पडलं... __________________________...

एकमेक

Image
तिला माहित होतं का , कि तो तिच्याशी बोलल्याशिवाय झोपत नव्हता... तिला माहित होतं का , कि तो नेहमी पांढरा रुमाल सोबत ठेवायचा , तिचा आवडता रंग म्हणून... तिला माहित होतं का , कि तो नेहमी मोबाईल डाव्या खिशात ठेवायचा... तिला माहित होतं का , कि तिला "त्याचा" सर्वात जास्त आवडलेला फोटो , त्याच्या फोन मध्ये तिचा "contact wallpaper" होता... तिला माहित होतं का , कि त्याचा wallpaper बदलायचा , जेव्हा तिचा DP बदलायचा... तिला माहित होतं का , कि तो त्याची आवड जिंकवी म्हणून , MATCH संपेपर्यंत FINGER CROSSED ठेवायचा , कितीही दुखलं तरी... तिला माहित होतं का , कि तो तिच्या पहिल्या भेटीनंतर नेहमी डाव्या पायात पहिल्यांदा मोजे चढवायचा... तिला माहित होतं का , कि त्याला वातावरण बदलांनी नाही तर , TENSIONS मुळे ताप यायचा... तिला माहित होतं का , कि निरुद्देश भटकणं , अगदी दूर दूर पर्यंत , हा त्याचा आवडता छंद होता... तिला माहित होतं का , कि तो महत्त्वाच्या कामाच्या अगोदर अर्धा तास कुणाशी , अगदी कुणाशीच बोलत नव्हता , त्याच्या श्रद्धेपायी... तिला माहित होतं का , कि तो "ते...

धक्का...?

        अवि आणि श्री . दोघंही नाट्यप्रेमी . श्री ला लेखनाची आवड ; तर अविला , श्री जे लिहील , त्याला दृश्य रूप द्यायची ! कॉलेज पासून एकत्र . अनेक एकांकिका स्पर्धा गाजवलेल्या , या जोडगोळीने . नाटकावर निरंतन प्रेम दोघांचं . कॉलेज नंतर दोघंही नोकरीला लागलेले , कुटुंबाकरिता . पण , नाटकावरचं त्यांचं प्रेम तसूभरही कमी नव्हतं झालं . दोघे हौशी नाट्यप्रयोग करत राहायचे . श्री त्यातल्या त्यात सर्जनशील . सतत नवनवीन प्रयोग करत राहायची त्याला फार खुमखुमी .         असाच एकदा अविला श्री चा कॉल आला . " अरे , वेळ आहे का ? येतोस का घरी जरा ? नवीन विषय घोळतोय डोक्यात . ..... . नाही , नाही ! विनोदी किंवा social सोडून काहीतरी करूया म्हणतोय . ..... . हो , हो . नक्की . आधी basic plot ऎकवतो . मग तुझे ते ' Directorial पॉईंट्स ' सांग . जरा जास्त वेळ जाईल , असं वाटतंय . So , जेवायलाच ये रात्री ; आणि बायको पण नाहीये , मनसोक्त गप्पा मारता येतील. .... . ठीके , मग . ये . वाट बघतोय . " .... " अरे , काही नाही . असाच सकाळी मनात विचार आला . तसंही , बऱ्याच दिवासात काही cre...