संवाद
तू माझी नक्कीच आठवण काढशील... तुला माझी नक्कीच आठवण येईल , जेव्हा तू एकटा असशील... तुला मी नक्की आठवेन , जेव्हा तुला सगळ्याचा कंटाळा येईल आणि तू उदास होशील... तुला मी नक्की आठवेन , जेव्हा नवनवीन जबाबदाऱ्या,नकोशा पण जरुरी, तुझ्या अंगावर पडतील... जगाला खोटं खोटं हसून उत्तरे देताना माझ्यातली निरागसता नक्की आठवेल तुला... डोळ्यातल्या अश्रूंना जबरदस्तीनं थोपवताना, जरूर आठवेल तुला माझ्यातला मोकळेपणा... स्वातंत्र्य तर तुला मिळेलच, नक्कीच, पण माझ्यातल्या स्वातंत्र्याची वेगळी मजा तुला नक्की जाणवेल... स्वतंत्र जगताना माझ्यासारखं बांधील, पण मोकळेपणानं जगावं असं वाटेल तुला, पण तुझा नाईलाज असेल... त्यावेळी फक्त मी आठवत राहीन तुला... तू अगदी जग फिरून येशील, सगळ्या सगळ्या वाहनात बसशील, मजा करशील, पण माझ्यासोबत जमिनीवर, गुडघ्यावर बसून, जोरजोरात फिरवलेली गाडी तुला नक्कीच त्यापेक्षा जास्त आनंद देईल... तू पावसातून रेनकोट घालून जाताना तुला नक्की आठवेल, माझ्यासोबतचं पावसात मनसोक्त भिजणं, चिखल उडवत बेधुंद नाचणं... जगाशी स्वार्थासाठी खोटं बोलताना तुला नक्की जाणवेल, माझी निरागसता, माझ्य...