...
एक विक्रेता होता. Specifically खेळणीविक्रेता. म्हणजे त्याच्याकडं सगळ्या प्रकारची खेळणी होती. जी लहान मुलांना खूप आवडतात, अशी सगळी खेळणी. या खेळण्यांमध्ये सगळं आलं हां. म्हणजे बघा ती छोटी छोटी घरं, मेकॅनो, लहान लहान गाड्या आणि गुल्लक - ते पैसे ठेवल्यावर कुत्रं बाहेर येऊन पैसे घेऊन आत जातं बघा- तसला गुल्लक वगैरे. आणि हा बाहुल्या पण होत्या हां. सगळ्या एकाच आकाराच्या पण वेगवेगळ्या रंग-रूपाच्या. तर असं सगळं होतं त्या विक्रेत्याकडं. पण त्या विक्रेत्याचा एकच problem होता. त्याच्याकडं दुकान नव्हतं. त्यामुळं त्याला या सगळ्या गोष्टी एका stall वरच विकाव्या लागायच्या. आता stall च असल्यामुळं त्याला रोजच्या रोज रात्री सगळं सामान एका box मध्ये ठेवावं लागायचं. ok? म्हणजे कसं की, रात्र झाली की, stall रिकामा करा, सगळं सामान box मध्ये टाका. Box गोडाऊन मध्ये टाका. घरी जा. परत दुसऱ्या दिवशी सकाळी box गोडाऊनमधनं घ्या. Stall ची साफसफाई करा. सगळं सामान परत मांडा. आणि हां, एक मिनिट. आपल्या विक्रेत्याची stall वर सामान मांडायची पण एक पद्धत होती बरं का! पद्धत म्हणजे त्यानं सगळ्या सामानाचं grouping केलेल